डिजिटल युगात आपल्या लाडक्या बाप्पाचे
आगमन अधिक खास करूया. गणेशोत्सवातील
अप्रतिम क्षण, परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम –
फक्त 'हॅश टॅग बाप्पा' वर…

डिजिटल युगात आपल्या लाडक्या बाप्पाचे
आगमन अधिक खास करूया. गणेशोत्सवातील
अप्रतिम क्षण, परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम –
फक्त 'हॅश टॅग बाप्पा' वर…

उत्सव बाप्पाचा
सोहळा महाराष्ट्राचा !

यंदाचा उत्सव डिजिटली
साजरा करूया !

गणेशोत्सव हा फक्त एक सण नाही, तर तो आपल्या सर्वांचा श्वास आणि आनंद आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या आगमनाची ओढ… या प्रत्येक भावनेला डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र आणण्याचे काम हॅशटॅग बाप्पा करत आहे.
pngwing.com (3)

मुंबईतील गणेश मंडळांचे दर्शन
ऐका क्लिक वर

मुंबईतील चाळ संस्कृतीपासून ते उंच टॉवरपर्यंत, प्रत्येकाच्या मनात बाप्पासाठी एक खास स्थान आहे. मुंबईतील मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी होणारी गर्दी, प्रसिद्ध गणेश मंडळांचे आकर्षण आणि दहा दिवसांत सर्व मंडळांना भेट देण्याची अशक्यता लक्षात घेऊन हॅशटॅग बाप्पा हे डिजिटल व्यासपीठ उभे करण्यात आले आहे. आता राहून गेलेल्या बाप्पाचे दर्शन घ्या, आपल्या आवडत्या मंडळाची माहिती जाणून घ्या आणि घरबसल्या मुंबईच्या गणेशोत्सवाचा अनुभव घ्या.
हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२६
बाप्पाचे दर्शन

मुंबईतील विविध गणेश मंडळांमधील बाप्पाचे दर्शन घरबसल्या घ्या.

मंडळाची माहिती

मंडळाचा इतिहास, स्थापना, परिसर आणि इतर महत्त्वाची माहिती एका ठिकाणी.

मंडळांचे उपक्रम

सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांची माहिती जाणून घ्या.

लाईव्ह दर्शन

निवडक गणेश मंडळांचे थेट प्रक्षेपण पाहा आणि उत्सवाशी जोडलेले राहा.

एका QR कोडपासून एका मोठ्या चळवळीपर्यंत

तुमचा बाप्पा... आता जगाच्या स्क्रीनवर!

मुंबईच्या गणेशोत्सवाची भक्ती, परंपरा आणि उत्साह डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचवण्याच्या या प्रवासात सहभागी व्हा.

मुंबईच्या गणेश मंडळांचा गौरव

मुंबईतील नामांकित तसेच उल्लेखनीय सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो.

मुंबईतील गणेश मंडळे शोधा

तुमच्या आवडत्या परिसरातील गणेश मंडळ शोधा, बाप्पाचे दर्शन घ्या आणि मंडळाच्या उपक्रमांची माहिती जाणून घ्या.