मुंबईतील गणेशोत्सव म्हंटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन एकाच क्लिक वर आता होऊ शकणार आहे. आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचलेलं छोटसं पाऊल आहे, हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.
मुंबईत चाळ संस्कृतीपासून ते टॉवरपर्यत प्रत्येकाच्या घराघरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या असतात.
मुंबईतील गणेश मंडळांचे दर्शन, माहिती, उपक्रम आणि थेट प्रक्षेपण
सार्वजनिक गणेश मंडळांची वाढती प्रसिद्धी पाहता, ह्या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस देखील अपुरे पडतात. त्यामुळे राहून गेलेल्या तसेच घरबसल्या आपल्या आवडत्या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हॅशटॅग बाप्पा हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळामार्फत मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे एका क्लिकवर लाईव्ह दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. क्यु आर कोड स्कँन करुन मुंबईतील कोणत्याही गणपती मंडळाची सविस्तर माहिती, मंडळाच्या उपक्रमांचा आढावा तसेच थेट प्रक्षेपण घेवू शकता.
हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२६
मुंबईच्या गणेशोत्सवाला जगभर पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न
गणेशोत्सव हा केवळ एक सण नाही, तर ती महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि अथांग लोकशक्तीचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिलेल्या या उत्सवाने नेहमीच समाजाला एकत्र बांधण्याचे काम केले आहे. याच परंपरेला सन्मानित करत, गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने या पवित्र उत्सवाला 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून घोषित केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय आपल्या सांस्कृतिक वैभवावर मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.
सन २०२३ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभहस्ते गिरगावचा राजा चा पहिला क्यू आर कोड तयार करण्यात आला. मुंबईतील नामांकित आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव ह्या उपक्रमा अंतर्गत करण्यात येतो.